Latest Marathi News

BREAKING NEWS

येडेश्वरी ॲग्रोचा गळीत शुभारंभ बजरंग सोनवणे यांच्या हस्ते संपन्न ; पहिली उचल २४५० याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा…

0

बार्शी |

बार्शी तालुक्यातील येडेश्वरी ॲग्रो प्रॉडक्ट्स लि. युनिट नंबर २ खामगाव साखर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामात शुभारंभ करण्यात आला. कारखान्याकडून चालू हंगामात पहिली उचल २४५० याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा कारखान्याचे चेअरमन बजरंग बप्पा सोनवणे यांच्या शुभ हस्ते गळीत शुभारंभ पार पडला.

गेली कित्येक पूर्वीचा आर्यन शुगर हा कारखाना बंद अवस्थेत होता, जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनवणे यांनी विकत घेतला आहे. २०१३-१४ मधील कारखान्याकडे थकीत असणारे देणे ही बजरंग सोनवणे यांनी अदा केलेली आहेत. त्यामुळे बार्शी तालुक्यात विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे अशी शेतकरी वर्गामध्ये चर्चा आहे.

कारखान्याच्या गळीत शुभारंभ प्रसंगी कारखान्याचे संचालक श्रीधरराव(बाबा) भवर , नामदेव (बापू) खराडे, मधुकर (काका) बोंदर व सर्व खातेप्रमुख तसेच तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या आनंदाने उत्साहात उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.