Latest Marathi News

BREAKING NEWS

युती मैत्री फेस्टिवलचा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न…

युती मैत्री फेस्टिवलचा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न...

0

बार्शी-18 लायन्स क्लब बार्शी टाउन तेजस्विनी आयोजित महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेले युती मैत्री फेस्टिवलचे उद्घाटन एम जे एफ निलम लोंढे-पाटील फलटण,यांच्या हस्ते व मंगला कटारिया, सौ विजयश्री पाटील, सौ स्मिता सुराणा,सौ रतन हाजगुडे. यांच्या उपस्थितीत करण्यात आला. लायन्सच्या डिस्टिक-वुमन एम्पायरमेंट च्या चेअरमन सौ लोंढे-पाटील मॅडम यांनी त्यांच्या मनोगत व्यक्त करताना,हे महिला फेस्टिवलचे नेटके व सुंदर नियोजनाचे कौतुक केले व बार्शी तालुक्यातील महिलांसाठी त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले यासाठी शुभेच्छा दिल्या. हे मैत्री फेस्टिवल 17 व 18 सप्टेंबर रोजी लिंगायत बोर्डिंग येथे दोन दिवस होणार आहे. यामध्ये मेकअप आर्टिस्ट स्पर्धा, सोलो डान्स,मदर बेबी , केक डेकोरेशन, ग्रुप डान्स,अशा विविध १६ स्पर्धा होणार आहेत व विविध प्रकारचे शॉपिंग स्टॉल्स व खाद्यपदार्थचे स्टॉल्स असणार आहेत.येणाऱ्या सर्व मुली व महिलांसाठी मोफत Hb% / शुगर तपासणी, कोठारी लॅबोरेटरी तर्फे करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मुली व महिलांसाठी सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत आहे. तरी सर्व बार्शीकर मुली व महिलांनी याचा आनंद घ्यावा. असे आवाहन अध्यक्षा योगिता कटारिया व तेजस्विनीच्या सदस्यांनी केले आहे…

Leave A Reply

Your email address will not be published.