Latest Marathi News

BREAKING NEWS

युक्रेनहून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांना MBBS पूर्ण करण्यासाठी मिळणार संधी

0

मुंबई |

रशिया आणि युक्रेनमधल्या संघर्षामुळे युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांना मेडिकलचं शिक्षण अर्धवट सोडून मायदेशी परतावं लागलं. या मुलांना भारतात शिक्षण पूर्ण करण्याच्या संधीबाबत संभ्रम होता. या विद्यार्थ्यांना एमबीबीएस फायनल परीक्षेचा पार्ट 1 आणि पार्ट 2 उत्तीर्ण होण्याची संधी दिली जाईल.

युक्रेनमधून परतलेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस फायनल परीक्षा उत्तीर्ण होण्याची संधी देण्यात येणार आहे; मात्र त्यांना एका वर्षाच्या आत मेडिकल अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.

परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना दोन वर्षांची इंटर्नशिप करावी लागेल. तसंच या विद्यार्थ्यांना फायनल परीक्षा उत्तीर्ण होण्याची ही शेवटची संधी असेल, असं केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात स्पष्ट केलंय.

Leave A Reply

Your email address will not be published.