Latest Marathi News

BREAKING NEWS

‘या’ सोसायटीमध्ये सॅनिटरी पॅड व्हेंडिंग चंद्रकांतदादांच्या हस्ते लोकार्पण

0

पुणे |

पुणे जिल्ह्यातील कोथरूड मतदारसंघांमध्ये उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येतात. मग ते फिरते वाचनालय असो वा लहान मुलांसाठी घेतलेल्या किल्ल्याच्या स्पर्धा त्याची चर्चा सर्वदूर होताना दिसून येते. सर्वसामान्य नागरिक डोळ्यासमोर ठेवून महिला लहान, मुले व कष्टकरी वर्ग हा डोळ्यासमोर ठेवून विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते.

कोथरूड मधील घरकाम करणाऱ्या महिलांचे आरोग्य उत्तम राहावे, त्या काम करत असलेल्या सोसायटीच्या लोकसहभागातून सॅनिटरी पॅड व्हेंडिंग व व्हँनिशिंग मशीन कार्यान्वित करण्याचा संकल्प करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर बाणेर मधील कम्फर्ट झोन सोसायटीमध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते २८ मार्च रोजी लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा व आरोग्याची काळजी घ्यावी अशी आवहानही पालकमंत्र्यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.