पुणे |
लोटस बिझनेस स्कूलच्या वतीने आयोजित ‘अंकुरन २०२२’ या कार्यक्रमात सहभागी होऊन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शेतकरी शिक्षण कार्यक्रम आणि उद्योजकता विकास उपक्रमामार्फत रोजगार निर्मिती आणि व्यवसायासाठी हे बिझनेस स्कूल विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देते.
विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक वर्षात शेती जगावी, भविष्यात शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी काम करावे, तसेच सर्वांनी मातृभाषेतून शिक्षणासह संवादाला महत्त्व द्यावे, अशा तीन महत्त्वाच्या मुद्दयांवर भर देण्याचे आवाहन केले. याबरोबरच नवीन शैक्षणिक धोरणामुळे आता सर्वांना आपल्याला आवडीचे विषयाचे शिक्षण घेण्याची जी संधी मिळाली आहे, त्या संधीचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा, असेही या निमित्ताने नमूद केले.

या कार्यक्रमास साखर आयुक्त शेखर गायकवाड, जसप्रीत छाबडा, चारुदत्त बोधनकर, डॉ. सतीश गायकवाड यांच्यासह लोटस बिझनेस स्कूलचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.