Latest Marathi News

BREAKING NEWS

मोठी बातमी! शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर

0

मुंबई |

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात न्यायालयीन कोठडीत
असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. ईडीने अटक केल्यानंतर १०१ दिवसांनी कोर्टानं त्यांना जामीन दिला आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणाऱ्या प्रवीण राऊत यांना ईडीने दणका दिला होता. आज या
दोघांच्याही जामीन अर्जावर निकाल आला आहे. संजय राऊत यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात मोठा दिलासा दिला आहे.

ईडीनं जामिनाला विरोध करताना संजय राऊत हे प्रभावशाली व्यक्ती असून ते बाहेर पडल्यावर साक्षीदारांवर दबाव आणतील, अशी भीती व्यक्त केली होती. तर प्रवीण राऊत यांनी संजय राऊत यांना पैसे दिल्याचा कुठलाही पुरावा ईडीनेने सादर केलेला नाही, असा दावा राऊतांचे
वकील प्रदीप मुंदरगी यांनी केला होता. शेवटच्या सुनावणीवेळी न्यायालयाने संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला होता. आज याबाबत निकाल देताना राऊत यांना जामीन मंजूर केला आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने आदेश देताना मोठा दिलासा दिला. राऊत यांना तीन महिन्यानंतर जामीन मंजूर केला आहे. पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर मुंबईतील विशेष न्यायालय बुधवारी आपला आदेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.