पुणे |
आमदार फोडण्याची संस्कृती कोणी सुरू केली अशी म्हणत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. राज्यातील राजकीय संस्कृती हा एक चिंतेचा विषय झाला आहे. सगळ्या पक्षांनी एकत्र बसून काय बोलावे काय बोलू नये यावर चर्चा करणे गरजेच आहे. कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. आता त्यावर दिलगिरी व्यक्त करत हा विषय संपावे असे वाटते. जुन्या काळात यादी काढली, तर अब्दुल सत्तार यांचे समर्थन असे होईल जे मला करायचे नाही, असे चंद्रकांत पाटील पालकमंत्री यांनी म्हटले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना टार्गेट करणे चुकीचे आहे, असे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटले आहे. या सत्ता समीकरणमध्ये असे काही झाले नाही. खोके सोडा, राणे, भुजबळ, नाईक यांना बाहेर कोणी काढले, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसवर चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.