शरद पवार हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. माझे वडिल असते तर त्याच वयाचे असते. त्यामुळे मुलगा किती पुढे गेला तरी बापाला असं वाटतं की त्याला कमी समजतं. त्या भावनेतून शरद पवार बोलले असतील. त्याहीपेक्षा मला असं वाटतेय की माझ्या खांद्यावरून, शरद पवार यांना बांद्रयाच्या सिनिअर आणि बारामतीच्या ज्युनिअरवर बंदूक चालवायची आहे,अशी टीका शरद पवार यांच्यावर फडणवीस यांनी केली आहे.कोकण दौऱ्याच्या सुरूवातीला पत्रकारांशी ते बोलत होते.
यावेळी बोलताना राज्य सरकारने कोकणसाठी दिलेली मदत तोकडी असल्याचं वक्तव्यही त्यांनी केलं. ते म्हणाले की, ‘चक्रिवादळात फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळे झाडांचा विचार करुन आपल्याला नुकसान भरपाई द्यावी लागेल, १५ हजार रोख द्या अशी मागणी केली होती, ती सरकारने मान्य केलेली नाही. तसेच भांड्यांसाठीही अत्यंत तोकडी मदत केली आहे.’ अनेक गोष्टींचे नुकसान झाले आहे, कोकणासाठी किमान सात ते साडेसात कोटीचं पॅकेज द्यावं लागेल, तरच कोकण परत उभं राहिलं, असेही ते म्हणाले.