मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रवादीला दणका ; शिर्डीत चिंतन शिबिर चालू असताना पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
मुंबई |
शिर्डीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंथनशिबीर चालू असताना मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आशिर्वादाने आमदार श्री. महेश शिंदे तसेच, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कोरेगांवचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. अभय तावरे व पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असून, या घटनेने राजकीय वर्तुळात जबरदस्त खळबळ उडाली आहे.
सातारा जिल्ह्यातील विजयराव घोरपडे, विलासकाका पवार, राजू आप्पा घोरपडे यांच्या उपस्थितीत कोलवडी विकास सोसायटीचे अध्यक्ष भानुदास भोसले (तात्या), सुनिल बापू भोसले, भाडळे गावचे माजी सरपंच धनंजय तारळकर, किरण घोरपडे, रामभाऊ निकम, अरविंद तारळकर, महेश चव्हाण, निलेश जाधव, सचिन जाधव, वैभव भोसले, राजेंद्र वायदंडे, आकाश खाडे, अमर भोसले, दिलीप भोसले, सचिन भोसले, संजय भोसले, शरदभाऊ भोसले, सुनिलराव घोरपडे, हनमंतराव
जाधव, अविनाश यशवंत मोहिते, राजू साळुंखे, सचिन कणसे, चंदुकाका पवार, अनिल अवचिते, रमेश कलाटे, शांताराम चाटे, अदित्य तावरे आणि सुनिल धुमाळ व शेकडो कार्यकर्त्यांनी आज दि. ५ नोव्हेंबर, २०२२ रोजी प्रवेश घेऊन पक्षसंघटना बळकटीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
शिर्डीत एकीकडे राष्ट्रवादीचे मंथन सुरु असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे अनेक जेष्ठ कार्यकर्ते मात्र बाळासाहेबांच्या शिवसेनेची वाट धरताना दिसत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या लोकोपयोगी
कामाच्या घडाक्यामुळे इतर पक्षातील कार्यकर्तेही भारावून गेल्याने प्रचंड प्रमाणात आकर्षित होत आहेत. मुख्यमंत्री यांच्या कामाच्या प्रभावामुळे येत्या काही काळात आणखी अन्य पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करतील असा राजकीय अंदाज व्यक्त होत आहे.