Latest Marathi News

BREAKING NEWS

“गोरगरीब जनतेला व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून द्यावा” – चंद्रकांतदादा पाटील

0

पुणे |

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. डॉ. भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री स्वनिधी आणि पुणे विभागीय बँकर्स समितीची बैठक झाली. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून देत त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

या बैठकीस खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीरंग बारणे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, महाराष्ट्र बँकेचे कार्यकारी संचालक विक्रम कुमार, राज्याचे कृषि आयुक्त धीरज कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, नगर विकास संचालक किरण कुमार, पुणे विभागातील वरिष्ठ अधिकारी, नाबार्ड तसंच रिझर्व्ह बँकेचे अधिकारी आणि विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.