मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासह आज बीड येथे जाऊन शिवसंग्रामचे नेते विनायकराव मेटे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासह आज बीड येथे जाऊन शिवसंग्रामचे नेते विनायकराव मेटे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
ॐ शान्ति🙏🏽
मराठा समाज, उसतोड कामगारांचे प्रश्न अशा अनेक विषयांत त्यांनी संघर्ष केला. अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामातही त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी हाती घेतलेले कार्य पूर्णत्त्वास नेण्याचा संकल्प हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल!