Latest Marathi News

BREAKING NEWS

“मी कोणाला घाबरत नाही, हिम्मत असेल तर समोर या…!” शाई फेक प्रकरणावर चंद्रकांतदादा पाटील म्हणाले

0

पुणे |

मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आले, असता त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. यानंतर पोलिसांनी शाई फेकणाऱ्यांना ताब्यात घेतलं. या घटनेनंतर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मी कुणाला घाबरत नाही, हिंमत असेल तर समोरुन या, असं म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील हे चिंचवडमधील मोरया गोसावी संजीवन
समाधी महोत्सवाचा शुभारंभ करायला आले. कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वी एका व्यक्तिनं चंद्रकांत पाटलांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. एका पदाधिकाऱ्याच्या घरातून ते कार्यक्रमस्थळी निघाले होते. तेव्हाच एकाने थेट त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली अन् त्यांनी महात्मा फुलेंच्या घोषणा दिल्या. मी कार्यक्रमाला चाललो आहे. मी सर्व कार्यक्रम करणार आहे. मी कुणाला घाबरत नाही. अशा प्रकारे पराचा कावळा करणं, दिलगिरी व्यक्त केली असतानाही असा भ्याडपणे हल्ला करणं चुकीचं आहे. हिंमत असेल तर समोरुन या. सगळं पोलिस डिपार्टमेंट बाजूला करतो, असं ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, ही झुंडशाही आहे. ही झुंडशाही महाराष्ट्र शासन सहन करणार नाही. याचं जे काही आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाहतील. आज आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना खुली छुट दिली असती तर काय झालं असतं. मात्र ही आमची संस्कृती नाही. शब्दाला शब्दाने टक्कर देता येते. मी काल आणि आजही दिलगिरी पक्त केली. गिरणी कामगारांचा मुलगा या स्टेजपर्यंत जाणं सरंजामी लोकांना झेपत नाही. त्यामुळं हे भ्याड हल्ले चालले आहेत. उद्यापासून पोलिस प्रोटेक्शनही नसेल, हिंमत असेल तर समोर या, असंही पाटील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.