मुंबई |
‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्रे साधने प्रकाशन समिती’ची बैठक मंत्रालय, मुंबई येथे संपन्न झाली. यावेळी ‘शोध महाराजा सयाजीरावांचा’ या समितीने तीन वर्षांत केलेल्या कार्याच्या अहवालचे प्रकाशन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील बोलताना म्हणाले, भारताच्या वैचारिक बांधणीत सामाजिक शैक्षणिक बांधणीत त्यांनी सर्वार्थाने काम केले. शेती, शिक्षण, प्रशासन, उद्योग, सामाजिक सुधारणा, न्याय यासंदर्भात त्यांचे योगदान मोठे आहे. आजही ते मार्गदर्शक आहे, स्वातंत्र्यपूर्व काळात लोकशाही संविधानाचा पाया घातला. अनेक क्रांतीकारकांना मदत केली.
यावेळी ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्रे साधने प्रकाशन समिती’चे सदस्य जेष्ठ साहित्यिक बाबा भांड, बडोदा विद्यापीठाच्या कुलगुरू आणि समितीचे सदस्य श्रीमती राजमाता सुभांगीनी राजे गायकवाड, डॉ. भारती पाटील, प्रा. शिवाजी देवनाळे, श्रीमती मंदा हिंगुराव, डॉ.विजय शिंदे, दिनेश पाटील व संबंधित अधिकारी उपस्थित होते.