Latest Marathi News

BREAKING NEWS

महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्रे साधने समितीच्या सदस्यांचे मानधन तातडीने द्यावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात दादा पाटील यांच्या सूचना

0

मुंबई |

महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या ३४ नवीन ग्रंथ प्रकाशनास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा समितीचे अध्यक्ष चंद्रकात दादा पाटील यांनी मान्यता देऊन महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्रे साधने समितीच्या सदस्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे मानधन तातडीने देण्यात यावे. अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.पाटील यांनी दिल्या.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्रे साधने प्रकाशन समितीची बैठक मंत्रालय येथे संपन्न झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते “शोध महाराजा सयाजीरावांचा” या समितीने तीन वर्षांत केलेल्या कार्याचा अहवालाचे प्रकाश करण्यात आले.

यावेळी महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्रे साधने प्रकाशन समितीचे सदस्य जेष्ठ साहित्यिक बाबा भांड, बडोदा विद्यापीठाच्या कुलगुरू व समितीचे सदस्य श्रीमती राजमाता शुभांगीनी राजे गायकवाड, डॉ. भारती पाटील,प्रा शिवाजी देवनाळे ,श्रीमती मंदा हिंगुराव , डॉ.विजय शिंदे ,दिनेश पाटील व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. नामदार दादा पाटील म्हणाले,स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वर्षी समितीचे सदस्य बाबा भांड यांनी सयाजीराव गायकवाड यांच्या संबंधीच्या लंडनच्या अभिलेखागारातून 15 दुर्मिळ कागदपत्रे मिळविले आहेत. ही समाधान आणि आनंदाची बाब आहे. त्याचे प्रकाशन लवकरच राज्य शासनाकडून करण्यात येईल. हा नवा इतिहास संशोधकास नक्कीच प्रेरणा देईल. हे सर्व साहित्य ऑनलाइन उपलब्ध व्हावे यासाठी वेबसाईट तयार करण्यात आली आहे. याचे उद्घाटन लवकरच करण्यात येईल.असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. या समितीने तीन वर्षात २६ हजार पानाचे ६२ ग्रंथ प्रकाशित केले यात ३२ ग्रंथ मराठीत २० ग्रंथ इंग्रजी आणि १० ग्रंथ हिंदी भाषेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.