Latest Marathi News

BREAKING NEWS

भिडे वाड्याच्या राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – चंद्रकांत पाटील

0

पुणे |

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी १८४८ मध्ये बुधवार पेठेतील भिडे वाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरु केली. या वस्तूला एक इतिहास आहे. त्याचे राष्ट्रीय स्मारक व्हायलाच हवे, अशी मागणी पहिल्यापासूनच करण्यात येत आहे. त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्याचा पाठपुरावा केला आहे. स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली गेली, त्या भिडे वाड्याचं राष्ट्रीय स्मारक होण्याबाबत जागामालक पूना मर्चंट बँकेचे अध्यक्ष विजय ढेरे यांच्याशी चंद्रकांत पाटील यांनी चर्चा केली. या सकारात्मक चर्चेमुळे भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक निश्चितच होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

भिडे वाड्याचं राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात याबाबत राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचीही भेट घेतली होती. भिडे वाड्यासंदर्भातील वाद लवकर निकाली निघावा, यासाठी मूळ जागामालक पूना मर्चंट बॅंकेचे चेअरमन विजय ढेरे यांच्याशी ही बैठक घेऊन चंद्रकांत पाटील यांनी सविस्तर चर्चा केली.

भिडे वाड्याचं ऐतिहासिक महत्व लक्षात घेता तेथे राष्ट्रीय स्मारक होणं महत्वाचं आहे. हे स्मारक राज्यच नव्हे तर देशातील महिलांचं प्रेरणास्थान ठरेल, त्यामुळे पूना मर्चंट बॅंकेनं सहकार्याची भूमिका घ्यावी, असं आवाहन ढेरे यांना केलं. ढेरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत बॅंकेचे सभासद आणि संबंधितांशी चर्चा करून सहकार्याची भूमिका घेण्याचं आश्वासन दिलं. या वेळी महसूल विभागाचे अधिकारी राजेंद्र मुठेही उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.