बार्शी |
मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजनेचे 18 जानेवारी रोजी पूजन कर सल्लागार ज्ञानेश्वर टंकसाळे यांच्या हस्ते झाले. टंकसाळे ही बार्शी शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कर सल्लागार सुप्रसिद्ध आहेत. विद्यार्थी परिषदेचे माजी कार्यकर्ता म्हणूनही त्यांची ओळख सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजनाही गेल्या अनेक वर्षापासून बार्शी शहरांमध्ये अविरतपणे चालू आहे. वृद्ध व निराधारांच्या पालनपोषणाचा प्रश्न गंभीर बनत असताना त्यांच्यासाठी दोन वेळा सकस भोजनाची व्यवस्था मोफत करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे, यासोबत बार्शीतील विविध रुग्णालयात रुग्ण व नातेवाईकांसाठी मापक मापक दरात पोळी भाजी केंद्राची सोय करण्यात आली आहे, शहरातील काही हॉस्पिटलमध्येही ही सेवा अगदी नाममात्र दरात उपलब्ध आहे. मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गाळ काढण्याच्या मोहिमेपासून ते हे दर्जेदार व्याख्यानमालेचे वेळोवेळी आयोजनही केले जाते. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक गरजांची पूर्तता करणारे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.