भाजप महाराष्ट्राचे ‘किंग अँड क्वीन’ कॉन्टेस्ट २०२३ चे पुण्यात आयोजन… कॉन्टेस्टमध्ये अवश्य सहभागी व्हा, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
पुणे |
भारत म्हणजे विविधतेतली एकता. भारतातली ही विविधता आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक वळणावर सामोरी येते. जेवण्या-खाण्यापासून ते खाद्यसंस्कृतीपर्यंत प्रत्येक गोष्टीतलं वेगळेपण भारताच्या विविधतेला जणू अधोरेखित करतं, असे मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात पारंपरिक पोशाखांचा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे, त्यासंदर्भात चंद्रकांत पाटील ट्विट करत माहिती दिली.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे कि, एक नूर आदमी, दस नूर कपडा असं म्हणतात. प्रत्येक प्रांतातल्या वेशभूषेवर त्या त्या भागातल्या हवामानाचा मोठा प्रभाव असतो. त्याचप्रमाणे त्या भागातली आर्थिक सुबत्ता, सामाजिक परिस्थिती आणि संस्कृती आदी घटकही वेशभूषेवर परिणाम करतातच. भारताच्या या विविधतेतल्या एकात्मतेची ओळख पटवून घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठाद्वारे हा कार्यक्रम लवकरच आयोजित होतोय. त्यात अवश्य सहभागी व्हा, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
पुण्यात भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्या माध्यमातून भाजप महाराष्ट्राचे ‘किंग अँड क्वीन’ कॉन्टेस्ट २०२३ चे आयोजन करण्यात येणार आहे. पुण्यात खास पारंपरिक पोशाखांचा हा महोत्सव असणार आहे. डिंपल चोपडे या कार्यक्रमाचे संयोजक आहेत. याची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. तर जास्तीत जास्त पुणेकरांनी यात सहभागी व्हावे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
ट्विटर लिंक https://twitter.com/ChDadaPatil/status/1599723223859761152