Latest Marathi News

BREAKING NEWS

भाजपमध्ये पत्रकारांचेही ‘इनकमिंग’ ; या महत्त्वाच्या पदाची देण्यात आली जबाबदारी

0

मुंबई |

मराठी वृत्तवाहिन्यांत काम केलेल्या काही पत्रकारांनी मागील काही दिवसांत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून त्यांना लगेचच पदांची बक्षिसीही मिळाली आहे.

झी २४ तास या वृत्तवाहिनीत न्यूज अँकर म्हणून काम केलेले पत्रकार अजित चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर लगेचच अजित चव्हाण यांची भाजपच्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली.

आता एबीपी माझा वृत्तवाहिनीत काम केलेले पत्रकार नवनाथ बन यांनीही नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला असून, त्यांची महाराष्ट्र भाजपच्या माध्यम प्रमुखपदी नियुक्ती केल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.