भगवंत क्रिकेट असोसिएशन द्वारा आयोजित सीजन-1 मधील पुरस्कार वितरण सोहळा
भगवंत क्रिकेट असोसिएशन द्वारा आयोजित सीजन-1 मधील पुरस्कार वितरण सोहळा
भगवंत क्रिकेट असोसिएशन द्वारा आयोजित सीजन-1 मधील पुरस्कार वितरण सोहळा R.K. क्लब येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष सौ. स्नेहल गोविंदा भिसे प्रमुख पाहुणे श्री. गौतम कांकरिया, श्री धनंजय घोलप सदस्य BCA , श्री सचिन आजबे सदस्य BCA,श्री आनंद शेलार सर हेड -कोच, सौ.अनुराधा विकास माने सचिव BCA, सौ.हेमा गौतम कांकरिया सहसचिव BCA या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेता व उपविजेता संघाचा ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. BCA मधील जे खेळाडू जिल्हा क्रिकेट संघामध्ये निवड झालेले आहेत तसेच काही खेळाडू जिल्हा क्रिकेट संघाच्या प्रॅक्टिस मॅचेस मध्ये निवड झालेले आहेत त्यांचादेखील विशेष गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे गौतम कांकरिया यांनी खेळाडूंना अतिशय चांगले मार्गदर्शन केले. असोसिएशनचे कोच आनंद शेलार सर यांनी न्यूट्रिशन डायट संदर्भात पालकांना व खेळाडूंना चांगले मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विकास माने यांनी केले.