Latest Marathi News

BREAKING NEWS

“ज्यांनी आभाळ कवेत घेतलं”चं विरेश प्रभूं कडून अभिनंदन!

"ज्यांनी आभाळ कवेत घेतलं"चं विरेश प्रभूं कडून अभिनंदन!

0

नमस्कार,
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव आणि महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ मान्यवरांच्या व्यक्तिमत्त्वांच्या गुणवैशिष्ट्यांवर प्रकाश टाकणाऱ्या माझ्या “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं ” या पुस्तकाचे व त्यात ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिचित्रांचे मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त विरेश प्रभू यांनी कौतुक करुन अभिनंदन केले.मागच्या सप्ताहात भारतीय जनता पक्षाचे नेते वेदप्रकाश शर्मा आणि विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचे खाजगी सचिव अविनाश सोलवट यांच्या हस्ते पुस्तक व व्यक्तिचित्राची फ्रेम भेट देण्यात आली.माझे मित्र प्रगती प्रकाशनचे संचालक दत्ता थोरे, संतोष पवार आणि चित्रकार नितीन खिलारे यांच्या सहकार्याने हाती घेतलेल्या मी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे राज्यभर सर्वस्तरातून स्वागत आणि कौतुक झाले.या पुस्तकातील मान्यवर व्यक्तिमत्त्वांत विरेश प्रभू यांचाही समावेश आहे.
-राजा माने,
संपादक, राजकीय विश्लेषक, माध्यम तज्ज्ञ.
अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.

Leave A Reply

Your email address will not be published.