Latest Marathi News

BREAKING NEWS

बोम्मईचे वर्तन म्हणजे केंद्राच्या बिघडलेल्या लाडक्या बाळाप्रमाणे; नीलम गोऱ्हेचे टीकास्त्र

0

सोलापूर |

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे वर्तन म्हणजे केंद्राच्या बिघडलेल्या लाडक्या बाळाप्रमाणे आहे, ते अगदी हातपाय आपटत आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा तिखट शब्दांत शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र कर्नाटक मुद्द्यावर बोलताना नीलम गोऱ्हे यांनी माहिती दिली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला मोठा इतिहास आहे. पण कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने बोलत आहेत, ते एकप्रकारे न्यायसंस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगली जिल्ह्याच्या जत आणि सोलापूर व अक्कलकोटवर ट्विट करत दावा सांगितला आहे. या
ट्विटनंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांकडून कर्नाटक सरकारला इशारे दिले जात आहेत. महाराष्ट्र राज्यातील वातावरण ढवळून निघाले.

कर्नाटकातील बेळगावात मराठीचा अपमान होतो. सामोपचाराने मिटवून घ्यायचा ठेका केवळ महाराष्ट्रानेच घेतलेला आहे का असा सावल नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहेत, त्यांचा न्याय संस्थेवर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न असल्यासारख आहे, असे वाटत आहे. बोम्मई यांचे वर्तन म्हणजे केंद्राच्या बिघडलेल्या लाडक्या बाळाप्रमाणे आहे. ते अगदी हातपाय आपटत आहेत.

हा वाद पेटविण्यामागे कोणी तरी षड्यंत्र आहे-

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना संयुक्त महाराष्ट्राची भूमिका होती. त्या आधीच्या मुख्यमंत्र्यांनीही तीच भूमिका घेतली होती. तरीही बसवराज बोम्मई असे बेताल वक्तव्य करत असतील, तर नक्कीच त्यामागे कोणीतरी षडयंत्र रचत आहे. महाराष्ट्रा राज्याचा अभिमन्यू करण्याचा हेतू मराठीद्वे लोकांचा आहे, असं वाटत आहे. आम्ही कानडी लोकांच्या विरोधात नाही. मात्र, कर्नाटकचे मुख्यमंत्र पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे ही चौकी आमची, ती चौक आमची अशा पद्धतीच्या विषारी भावनेतून जे वक्तव्य करत आहेत, ते निश्चित निषेधार्ह आहे. असे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे या म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.