Latest Marathi News

BREAKING NEWS

बार्शी | ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातात ; बोरगावचे सरपंच जागीच ठार

0

बार्शी |

बार्शी तालुक्यातील बोरगाव (का) येथील विद्यमान सरपंच डॉ. लक्ष्मण वैजिनाथ जाधवर (वय ६५) यांचे वैराग- सोलापूर राज्य मार्गावरील सासुरे फाट्याजवळ दुचाकी व ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. हा अपघात शुक्रवारी (ता. १९) रात्री आठच्या सुमारास घडला.

वैराग- सोलापूर रोडवरील सासुरे फाट्याजवळ पंक्चर झालेला विनानंबरचा ट्रॅक्टर वैरागच्या विरुद्ध दिशेने उभा होता. त्यावेळी डॉ. लक्ष्मण जाधवर हे त्यांच्या मोटारसायकलवरून (एमएच १३ ईए १५५८) बार्शीकडे निघाले होते. यावेळी ट्रॅकटरच्या मागील बाजूच्या ट्रॉलीला मोटारसायकल धडकली. या अपघातात डॉ. जाधवर यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद वैराग पोलिसात करण्यात आली आहे. अधिक तपास वैराग पोलीस करत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व मुलगी असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.