Latest Marathi News

BREAKING NEWS

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

0

पुणे |

पुणे शहरातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपती मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने हा मोठा निर्णय घेतला असून पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे.

त्यामुळं आता पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर सी दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखलं जाणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. चिंचवडच्या मोरया गोसावी देवस्थानच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचंही आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.