Latest Marathi News

BREAKING NEWS

बार्शी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यपालांना निषेधाचे पत्र लिहून केला निषेध व्यक्त..

0

बार्शी |

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य करून छत्रपती शिवाजी महाराज व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना केली याप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रातून राज्यपालांचा निषेध व्यक्त करीत आहेत.
यापूर्वी देखील राज्यपाल कोश्यारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विवाहाबाबत आक्षेपार्ह वक्तृत्व करून अपमानास्पद शब्द वापरले होते.

तरी राज्यपाल वारंवार असे बोलून महाराष्ट्रातील शांतता भंग करीत असून तत्काळ त्यांची हकलपठ्ठी करण्यात यावी यासाठी बार्शी शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पोस्ट कार्ड वर निषेध व्यक्त करीत पत्र लिहून निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी शहराध्यक्ष विजय साळुंके तालुकाध्यक्ष सतीश पाचकुडवे युवक काँग्रेस बार्शी विधानसभा अध्यक्ष निखिल मस्के शहराध्यक्ष संतोष शेट्टी, वसीम पठाण अल्पसंख्यांक, बप्पा सुतार, माणिक पवार,अक्षय चव्हाण प्रसाद आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.