“पालमपूरमध्ये चंद्रकांतदादांचा वैयक्तिक भेटीगाठीवर जोर ; गुजरात निवडणूक जिंकणार असा विश्वास केला व्यक्त..!”
पालमपूर |
भाजपचे ज्येष्ठ नेते उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे गुजरात विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी पालनपुर येथे आहेत. आज २३ नोव्हेंबर रोजी चंद्रकांत दादांनी त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांशी संवाद साधला. गुजरात निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा पाठिंबा मिळत आहे असा विश्वासही चंद्रकांत दादांनी व्यक्त केला. चंद्रकांत दादा पाटील हे पालमपूर मध्ये अनिकेतभाई ठक्कर यांच्या प्रचारार्थ भेटीगाठी घेत आहेत.

गुजरातमधील पालनपूर शहरामध्ये वैयक्तिक भेटीगाठीवर भर दिला. यावेळी चंद्रकांत दादांनी त्याचे जुने सहकारी फलजीभाई चौधरी, जैन समाजचे वरिष्ठ नेते तथा डायमंड प्रसिद्ध उद्योजक दिलीपभाई शाह, रमेशभाई पटेल यासारख्या जुन्या मित्रांना व प्रतिष्ठित नागरिकांना भेटता आले. यावेळी विशाल ठकर युवा उद्योजक, प्रजापती समाजचे पिनाकिनभाई प्रजापती, आदि उपस्थित होते. यावेळी गुजरात निवडणुकीमध्ये भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नंबर एकला असेल असा विश्वास ही व्यक्त करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप गुजरात मधील विधानसभा निवडणूक लढवीत आहे. पालनपुर विधानसभा क्षेत्राची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचे नेते सर्वतोपरी प्रयत्न करत आहे व त्याला नागरिकाचाही चांगला पाठिंबा मिळत आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले.