बार्शी |
बार्शी शहरातील सुभाष नगर येथील एका २८ वर्षीय युवकाने गोडवान मधील लोखंडी पोलला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. स्वप्निल शरद नेवाळे (वय २८) रा. सुभाषनगर, बार्शी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दुसरी घटना तर बार्शी शहरातील गोंदील प्लॉट येते २५ वर्षीय गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सलीम अजित मोगल (वय २५) असे गळफास घेऊन मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. मोगल हे त्यांच्या आई मुमताज समवेत गोंदिल प्लॉट येते भाड्याने राहत होते. सलीम हा मिस्तरी काम करून उपजीविका भागवत होता.
मयताचा मित्र सचिन प्रताप नलावडे (वय २८)यांनी या घटनेची खबर शहर पोलिसात दिली आहे. तर दुसऱ्या घटनेत घरमालक महेश बाबुराव नलावडे (वय ३७) यांनी शहर पोलिसात दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एकाच दिवशी दोन तरुणांनी आत्महत्या केल्यामुळे बार्शी शहरांमध्ये शोककळा पसरली आहे.