बार्शीतील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात मैदानी स्पर्धेचे आयोजन ; खजिनदार बापू शितोळे यांनी केले उदघाटन
बार्शी |
शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धेत दिनांक ०७/११/२०२२ रोजी १०,००० मीटर धावणे या क्रीडा प्रकारापासून झाली. क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.शि.शि.प्र. मंडळाचे जनरल सेक्रेटरी पी.टी पाटील, उदघाटक शि.शि.प्र. मंडळाचे खजिनदार बापू शितोळे, स्पर्धा अध्यक्ष शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे, प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉ. भारती रेवडकर, प्राचार्य डॉ. गाढवे, मैदानी क्रीडा स्पर्धा सचिव प्राध्यापक डॉ. एस. एम. लांडगे, बी.पी.एड. विभाग प्रमुख प्रा. डॉ. ए. जी कांबळे, तसेच विद्यापीठ निवड समिती चेअरमन डॉ. किरण चोकाकर, सदस्य डॉ. अशोक पाटील आणि डॉ. समर्थ मनुकर विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. सचिन गायकवाड, प्रा. डॉ. बी. पी. शिखरे (आय क्यू ए सी) हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पी.टी पाटील यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले, व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. उदघाटक बापूसाहेब शितोळे यांनी जीवनात खेळाचे महत्व यासंबंधी मुलांना मार्गदर्शन केले, व शुभेच्छा दिल्या, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एस गोरे यांनीही मुलांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे प्राध्यापिका सुरवसे एस. एम. यांनी केले, तर प्रास्ताविक व आभार प्रा. डॉ. ए. जी कांबळे यांनी केले. यावेळी मैदानी क्रीडा स्पर्धेचे सचिव प्रा. डॉ. एस. एम. लांडगे, विविध महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक, तसेच महाविद्यालयाच्या सर्व विभागातील विभाग प्रमुख व प्राध्यापक वर्ग शिक्षकेत्तर कर्मचारी, उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून विविध महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक यांनी काम पाहिले. तसेच या स्पर्धा पार पाडण्यासाठी बी.पी.एड, एम, पी, एड चे सर्व प्राध्यापक वर्ग व प्रशिक्षणार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. या संपन्न झालेल्या मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विजेतेपद हे डी.बी.एफ. दयानंद कॉलेज सोलापूर यांनी पटकविले तर वैयक्तिक विजेतेपद (मुले) रितेश इतापे (डी.बी.एफ. दयानंद कॉलेज सोलापूर) (मुली) कु. संतोषी देशमुख (संगमेश्वर कॉलेज सोलापूर) याना मिळाले.