Latest Marathi News

BREAKING NEWS

पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच तुमच्या एवढी बाळ असत्यात, राजन पाटलांची जीभ घसरली

0

सोलापूर – मोहोळ तालुक्यातील सिकंदर टाकळी येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. राष्ट्रवादीचे राजन पाटील विरोधात राष्ट्रवादीचेच उमेश पाटील, तर भाजपचे धनंजय महाडिक यांच्या विरोधात भाजपचेच प्रशांत परिचारक असे चित्र निर्माण झाले आहे. भीमा साखर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक उद्या होणार आहे. यानिवडणुकीचा प्रचार करताना भाषणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या जात आहेत. मोहोळ तालुक्यात एका सभेत भाषण करताना राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांची जीभ घसरली आहे. विरोधक आमच्या पोरांना बाळ म्हणत्यात… यांना माहिती आहे का पाटलांच्या पोरांना लग्नाआधी तुमच्या एवढी बाळ असत्यात, असे वादग्रस्त विधान राजन पाटील यांनी केले आहे.

मोहोळ मतदारसंघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील हे सध्या भाजपच्या वाटेवर आहेत. राष्ट्रवादीचा हुकमी एक्का म्हणून त्यांच्या कडे पाहिले जात होते. सोलापूरच्या ग्रामीण राजकारणात राजन पाटील यांचा मोठा दबदबा आहे. राजन पाटील यांना बाळराजे राजन पाटील आणि विक्रांतराजे राजन पाटील अशी दोन मुले आहेत. ही दोन्ही मुले सोलापूरच्या राजकारणात सक्रिय होत आहेत. साधारणपणे १९८० पासून मोहोळ तालुक्यातील अनगर या गावातून राजन पाटील घराण्याचे राजकारण सुरू झाले आहे. सिकंदर टाकळी या गावातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजन पाटील यांची मुलं प्रचार करत आहेत.

राष्ट्रवादीच्या नेत्याने भाजप नेत्याला साथ देत भीमा सहकारी निवडणुकीत रणशिंग फुंकले आहे. मोहोळ तालुक्यातील नरखेड या गावातील राष्ट्रवादीचेच प्रवक्ते उमेश पाटील यांनी भाजपच्या प्रशांत परिचारकांना बळ दिले आहे. भीमाची सत्ता खेचून आणण्यासाठी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दोनच दिवसांपूर्वी राजन पाटलांच्या मुलाला विरोधकांनी बाळ असे म्हटले होते. त्यावर राजन पाटल एका सभेत उत्तर देताना त्यांची जीभ घसरली. पाटलांच्या पोरांना बाळ म्हटलं जातंय. तर पाटलांच्या पोरांना लग्नाआधी तुमच्या एवढी बाळ असतात, वयाच्या १७ व्या वर्षी ३०० ते २०० कलमं भोगणारी पोरं आहेत, असे वक्तव्य माजी आमदार राजन पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.