Latest Marathi News

BREAKING NEWS

बाणेर व बालेवाडी परिसरातील पाणीपुरवठा सूरळीतपणे सुरु ठेवा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0

पुणे |

बाणेर व बालेवाडी येथील नागरिकांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी परिसरातील पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू ठेवण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. विधानभवन येथे शहरातील पाणी पुरवठ्याबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

बाणेर व बालेवाडी परिसरातील नागरिकांना ४६ एमएलडी पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. या पाइपलाइनद्वारे होणारा पाणीपुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीने दक्षता घ्यावी, तसेच बालेवाडी जकातनाका, पाषाण-बाणेर लिंक मार्ग यांच्यासह पाण्याच्या टाकीची प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावे, असेही निर्देश यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिले.

या वेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.