Latest Marathi News

BREAKING NEWS

“प्रियकरासाठी त्याच्या मुलाच्या अपहरणाचा प्रेयसीचा प्रयत्न..!”

0

मुंबई |

पोलिस ठाण्यात एकत्र काम करत असताना पोलिस पतीचे तेथीलच महिला पोलिसासोबत प्रेमसंबंध जुळले. प्रेयसीने दोघांमध्ये येणाऱ्या पत्नीला घटस्फोटासाठी तगादा लावत तिच्या ७ वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्याची घटना भायखळा येथे समोर आली आहे. भायखळा परिसरात तक्रारदार महिला राहण्यास आहे.

त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या पोलिस पतीचे पोलिस ठाण्यात कार्यरत असताना तेथील महिलेशी प्रेमसंबंध होते. २९ सप्टेंबर २०२० रोजी प्रेयसीने राहत्या घरी येऊन दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती देत, घटस्फोट देण्यासाठी तगादा लावला.

सतत धमकी देण्यास सुरुवात केली. २०२१ मध्ये थेट घरात घुसून घटस्फोट नसेल देत तर २२ लाखांच्या खंडणीची मागणी केली. रक्कम दिली नाही म्हणून तक्रारदार यांना शिवीगाळ करत असभ्य वर्तन केले. रस्ता अडवून अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचाही प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याबाबत भायखळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.