Latest Marathi News

BREAKING NEWS

प्रयत्न करा, यश आपोआप मिळते – टीना डमरे महाराष्ट्र विद्यालय, बार्शी येथील महिला खेळाडूने दिला यशाचा पासवर्ड

प्रयत्न करा, यश आपोआप मिळते - टीना डमरे, महाराष्ट्र विद्यालय, बार्शी येथील महिला खेळाडूने दिला यशाचा पासवर्ड

0

 

 

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बार्शीच्या बी एड द्वितीय वर्ष सत्र तिसरे प्रशिक्षणार्थीच्या सराव अध्यापन व छात्र सेवाकाल शिबिर तथा शालेय आंतरवासिता उपक्रमाचे दिनांक १२ ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत महाराष्ट्र विद्यालय, बार्शी येथे आयोजन करण्यात आले आहे.

शालेय आंतरवासितामध्ये नवरात्र उत्सव अंतर्गत महिला खेळाडूची मुलाखत हा उपक्रम गुरुवार दिनांक २९ सप्टेंबर २०२२ या दिवशी आयोजित करण्यात आला. यात टीना डमरे ही महाराष्ट्र विद्यालय, बार्शी येथे इयत्ता नववी या वर्गात शिक्षण घेत असलेल्या खेळाडूची बी एड प्रशिक्षणार्थी अपर्णा पाटील यांनी घेतलेली मुलाखत-

 

व्हॉलीबॉल हा टीनाचा आवडता खेळ आहे. जाणून घेऊया टीनाचा व्हॉलीबॉल खेळाचा राज्यस्तरीय यशस्वी प्रवास. अपर्णा पाटील- व्हॉलीबॉल या खेळाची सुरुवात कधीपासून केली?

टीना डमरे – व्हॉलीबॉल हा खेळ मला खूप आवडतो. या खेळाची सुरुवात मी चौथीत असल्यापासून केलेली आहे. अपर्णा पाटील- व्हॉलीबॉल या खेळाची प्रेरणा कोणाकडून मिळाली?

टीना डमरे- माझी मोठी बहीण तिला मी लहानपणापासून व्हॉलीबॉल खेळताना पाहिलेलं आहे. त्यामुळे मला पण व्हॉलीबॉल खेळाची आवड निर्माण झाली. व्हॉलीबॉल खेळाची प्रेरणा ही मी तिच्याकडूनच घेतली आहे. अपर्णा पाटील – वयाच्या किती वर्षापासून व्हॉलीबॉल खेळाची प्रॅक्टिस सुरू केली?

टीना डमरे – मी इयत्ता सहावी म्हणजेच वयाच्या बाराव्या वर्षापासून व्हॉलीबॉल खेळ खेळत आहे. तेव्हापासूनच प्रॅक्टिस चालूच आहे.

अपर्णा पाटील – तुझे क्रीडा मार्गदर्शक कोण आहेत? टीना डमरे – बारंगुळे सर, पाटील सर, यमगर मॅडम तसेच वेळोवेळी मला सर्वच शिक्षक मार्गदर्शन करत असतात.

अपर्णा पाटील – तुम्ही कोणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवता?

टीना डमरे- माझे मार्गदर्शक बारंगुळे सर यांचा आदर्श मी डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करते. ६. अपर्णा पाटील – आहार कशा प्रकारचा घेता? टीना डमरे – दररोज सकाळी काजू, बदाम, दूध, अंडी आणि त्याचबरोबर जेवणामध्ये नॉनव्हेजचाही समावेश असतो. अपर्णा पाटील – खेळाडूची गुणवैशिष्ट्ये काय सांगता येतील?

टीना डमरे- खेळाडू हा पूर्ण वेगळाच असतो. खेळाडू स्ट्रॉंग असला पाहिजे. खेळाडूंच्या राहणीमानातही खूप फरक असतो.

अपर्णा पाटील – राज्य पातळीवर व्हॉलीबॉल खेळाडू म्हणून तुमचा अनुभव सांगा.

टीना डमरे – मी पहिल्यांदा एवढ्या लांब खेळासाठी गेले आणि तिथे पहायला मिळालं की मुलं ज्याप्रमाणे खेळ खेळतात अगदी तसेच तोडीस तोड मुलीही खेळ खेळतात. मी नागपूरची टीम पाहिली, लातूरची टीम पाहिली. आमच्या टीम मध्ये ही खूप छान खेळणाऱ्या मुलींचा समावेश आहे.

अपर्णा पाटील – तुमच्या यशामध्ये कोणाचा वाटा आहे असे तुम्हाला वाटते?

टीना डमरे – माझ्या यशामध्ये खूप व्यक्तींचा वाटा आहे. मम्मी, पप्पा, माझे मार्गदर्शक बारंगुळे सर, पाटील सर,यमगर मॅडम तसेच प्रॅक्टिस करून घेणारा आदित्य भैय्या या सर्वांचा समावेश होतो.

अपर्णा पाटील – अभ्यास आणि खेळ त्यांची सांगड कशी घालता?

टीना डमरे- ज्याप्रमाणे दररोज अभ्यास करणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे खेळासाठी प्रॅक्टिस करणे ही गरजेचे आहे. मी अभ्यासाबरोबरच व्हॉलीबॉल खेळाचेही प्रॅक्टिस करते. अपर्णा पाटील – उदयोन्मुख खेळाडूंसाठी तुम्ही काय सांगाल?

टीना डमरे- खेळात प्राविण्य दाखवणे हे फार कष्टाचे काम आहे. प्रयत्नाने सर्व काही मिळते. मी एवढेच सांगेन की प्रयत्न करा, यश आपोआप मिळते.

अपर्णा पाटील – धन्यवाद टीना. आपणांस खूप खूप शुभेच्छा.

Leave A Reply

Your email address will not be published.