सोलापूर |
चंद्रकांत दादा पाटील यांच्या साई फेक प्रकरणातील निलंबित अकरा पोलिसांचे निलंबन तात्काळ मागे घ्यावे या मागणीसाठी पंढरपूर येथे आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तोंडाला काळी पट्टी बांधून राज्य सरकार व चंद्रकांत दादा यांच्या विरोधात निषेध आंदोलन केले.
स्वतःच्या तोंडाचा पट्टा उघडा ठेवायचा जनतेच्या भावना दुखावतील असं वक्तव्य करायचं मग संविधानातील अधिकाराप्रमाणे जर याच्या विरोधात कुणी आवाज उठवला आंदोलन केले, तर त्याची मुस्कटदाबी करायची काम हे सरकार आणि या सरकारमधील नेतेमंडळी करत आहे स्वतःच्या चुकीच्या बोलण्यामुळे घडलेल्या प्रकाराचे शिक्षा बारा महिने 24 तास जनतेची सेवा करणाऱ्या पोलिसांना देणे कितपत योग्य आहे याचा विचार राज्य सरकारने तात्काळ करून हे निलंबन मागे घ्यावे अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करू.