Latest Marathi News

BREAKING NEWS

“पुन्हा गुजरातमध्ये भाजपची सत्ता येईल” – चंद्रकांतदादा पाटील

0

मुंबई |

गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार चालू आहे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी गुजरातमध्ये गेले आहेत. पुन्हा एकदा गुजरातमध्ये भाजपची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गुजरात मधील पालमपूर मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी भाजपचे उमेदवार अनिकेत भाई यांच्या प्रचारार्थ सभा घेतली, यावेळी बोलताना चंद्रकांतदादा म्हणाले की, गुजरात मध्ये भाजपला व्यापक जनसमर्थन मिळत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची प्रगती अविरत चालू आहे, गुजरातच्या विकासामध्ये ही मोदीजींनी कोणतीही कसर सोडलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा गुजरातमध्ये भाजपची सत्ता येईल असा विश्वास चंद्रकांतदादांनी व्यक्त केला, उन्हामध्ये सुद्धा लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यामुळे विधानसभेचे उमेदवार अनिकेत भाई प्रचंड बहुमताने विजयी होतील असे प्रतिपादनही चंद्रकांतदादांनी केले, प्रचार सभेवेळी भाजप पदाधिकारी व नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.