Latest Marathi News

BREAKING NEWS

गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जनतेचा मोठा पाठिंबा – चंद्रकांत पाटील 

0


राणावास : 

 गुजरात निवडणुकीतील पालनपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार अनिकेतभाई  ठाकरजी यांच्या प्रचारार्थ राणावास येथील ग्रामसभेला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबोधित  केले. ठाकूर समाजाचे नेते व काँग्रेसचे  प्रमुख कार्यकर्ता मंगलभाई ठाकूर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. 

गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.  पालनपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार श्री अनिकेतभाई ठाकर यांच्या प्रचारासाठी आज त्यांनी सामटी मोटा वास    येथे मुक्काम केला. सामटी मोटा वास  रहिवाशांचा पाठींबा पाहून अनिकेतभाईंचा विजय निश्चित असल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. 

गुजरात विधानसभा निवडणुकीतील पालनपूर मतदारसंघाचे उमेदवार अनिकेतभाई ठाकरजी यांच्या प्रचारार्थ समती येथील ग्रामसभेला चंद्रकांत पाटील यांनी संबोधित केले. त्यावेळी त्यांनी अनिकेतभाईंना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी अनिकेतभाई ठाकर, लालजीभाई प्रजापती, माजी आमदार कांतिभाई, फलजीभाई चौधरी आदी नेते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.