पुणे |
पुण्यातील एरवंडणे भागातील तेजलकुंज सोसायटीचा पुनर्विकास होत असून या सोसायटीच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पुण्यातील अनेक सोसायटीचा पुनर्विकास होऊ घातला आहे त्यामुळे ज्या सोसायटीच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे ते जलद गतीने पूर्ण होऊन नागरिकाला सर्व सुविधायुक्त घरे हस्तांतरित करण्यात यावीत अशी अपेक्षाही यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. या कामाच्या भूमिपूजना वेळी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व राजकीय पदाधिकारी ही उपस्थित होते, ही कामे लवकरात लवकर कशी पूर्ण होतील यासंबंधी संबंधित विभागाला चंद्रकांत दादांनी सूचना दिलेल्या आहेत.
या कार्यक्रमाला मनपा आयुक्त विक्रमकुमार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, भाजप प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, भाजप कोथरूड मंडळ अध्यक्ष पुणे जोशी संदीप खर्डेकर, गोखले कंट्रक्शनचे विशाल गोखले यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.