पुणेकरांसाठी पुणे मेट्रो खुली झाल्यावर वाहतूक कोंडीची समस्याही कमी होईल, चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
पुणे |
पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका मेट्रो स्थानक ते स्वारगेट या १७. ४ किलोमीटरच्या मार्गामध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा ६ किमीचा भूयारी मार्ग आहे. या भूमिगत मार्गाच्या भुयाराचे काम ४ जून रोजी टनेल बोअरिंग मशीनच्या साहाय्याने पूर्ण करण्यात आले आहे. मंगळवारी रेजहील डेपो ते रेजहील उन्नत मेट्रो स्थानक आणि त्यानंतर रेजहील उन्नत मेट्रो स्थानक ते शिवाजीनगर मेट्रो स्थानक त्यानंतर सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक अशी १३ किमीची मेट्रो चाचणी घेण्यात आली. पुणेकरांसाठी पुणे मेट्रो खुली झाल्यावर वाहतूक कोंडीची समस्याही कमी होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, मंगळवारी पुणे मेट्रोच्या इलेव्हेटेड सेक्शनपासून सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानकापर्यंत भूमिगत मार्गातून ट्रेन धावली. मेट्रोची ही चाचणी यशस्वी झाली असून यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे अभिनंदन! पुणेकरांसाठी पुणे मेट्रो खुली झाल्यावर वाहतूक कोंडीची समस्याही कमी होईल, असा विश्वास आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
पुणे मेट्रोच्या महत्वाच्या टप्प्यांपैकी हा तांत्रिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा असा टप्पा आहे. पुणे मेट्रोचे ८५ % काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे वेगाने सुरु आहेत. भूमिगत मार्गाचे काम अत्यंत आव्हानात्मक असे आहे. अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत भूमिगत मार्गाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे त्यामुळेच हि चाचणीने करणे शक्य झाले आहे.