बार्शी |
शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि अल्पसंख्याक विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती या तीन प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस बार्शीच्यावतीने तहसिल समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. बारबोले यांच्या नेतृत्वात प्रथमच राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली होती. यावेळी, निवेदन घेताना तहसीलदारांकडून पिक विमा संदर्भात उद्याच कृषी अधिकाऱ्यांसोबत अधिकृत बैठक लावण्याचे आश्वासन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बार्शी यांच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर रस्त्यावर बसून घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करण्यात आले. अल्पसंख्याक विध्यार्थीची मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती सुरू ठेवावी व त्या शिष्यवृत्तीमध्ये 3000 रुपये वाढ करावी. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक अपशब्द वापरतात तसेच महाराष्ट्रातील महापुरुषाबद्दलही मुद्दाम अपशब्द वापरून महाराष्ट्रतील जनतेच्या भावना दुखावतात. त्यामुळे कोश्यारी यांची हकालपट्टी करावी आणि केंद्र सरकारच्या पीक विमा कंपनीने अत्यल्प विमा शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याचे काम केलय, तो पीकविमा अधिकचा द्यावा, या मुद्द्यावर काँग्रेस , तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व अल्पसंख्याक सेलच्यावतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, सोलापूर महिला जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, बार्शी तालूका अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, बार्शी शहर अध्यक्ष, युवक अध्यक्ष, अल्पसंख्यांक अध्यक्ष, सर्व प्रभाग अध्यक्ष, पक्षातील पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.