पारंपरिक कापड निर्मितीपासून ते तांत्रिक वस्त्रोद्योगाकडे वाटचाल सुरु असुन या क्षेत्रात रोजगार निर्मितीला मोठी संधी उपलब्ध – चंद्रकांत पाटील
मुंबई |
केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांच्यासह तांत्रिक वस्त्रोद्योगांवरील आतंरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेचे ट्रायडेंट हॉटेल, मुंबई येथे संपन्न झाले. याचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्याच्या प्रस्तावित नवीन वस्त्रोद्योग धोरणात १० लाख रोजगार निर्मिती आणि ३६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी चंद्रकांत पाटील यांनी दिली. वस्त्रोद्योगामध्ये भारताने पूर्वीपासूनच आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. पारंपरिक कापड निर्मितीपासून ते तांत्रिक वस्त्रोद्योगाकडे वाटचाल सुरु असुन या क्षेत्रात रोजगार निर्मितीला मोठी संधी उपलब्ध आहे, असे चंद्रकांत पाटील यांनीं म्हटले.
टेक्नोटेक्स-२०२३ कर्टन रेझर सेरेमनीचे हॉटेल ट्रायडंट मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते.या परिषदेला केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी, वस्त्रोद्योग केंद्रीय सहसचिव राजीव सक्सेना, फिक्कीचे चेअरमन मोहन कावरी, चेअरमन (SRTEPC) धीरज शाह तसेच वस्त्रोद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.