मुंबई |
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान प्रकरणात नारायण राणे यांना न्यायालयानं दोषमुक्त केलं आहे.
या प्रकरणात पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्यानं नारायण राणे यांना दोषमुक्त करण्याचा निर्णय अलिबाग मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिला आहे. हा राणेंसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
१७ जानेवारी २०२२ रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या कोकण दौऱ्यादरम्यान महाडमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरल्याचा दावा करण्यात आला होता.