बार्शी-(खमक्या इंडिया नेटवर्क) ऊन वारा असो वा धो धो पाऊस असो एखाद्या विषयाशी मनापासून नाते जुळले की ओढ निर्माण होते त्याच ओढीचा प्रत्यय देणारा आजचा हा प्रसंग…
आभाळ गरजते,कशी वीज चमकते
खोप्यातलं पाखरु पंखाखाली घेते…
शेतकऱ्याची तिफंन पाहे हिरवं सपानं
वर्षाची आली खेप, तिला कष्टाने जपलं..
अकोल्याचे कवी देवानंद जवंजाळ यांच्याा या काव्यपंक्ती धो धो पाऊस सुरु असताना आपल्याही मनात दाटलेल्या भावनांशी नाते सांगतात.. पाखराला खोप्यातील पिलाला पंखाखाली घेण्याची जशी ओढ असते तश्शीच ओढ आपण लावलेल्या रोपट्याला सुरक्षित करण्यासाठी धो धो पावसात रोपट्या़कडे धावणाऱ्यांमध्ये दिसते…आज तोच अनुभव सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील वृक्षसंवर्धन समितीच्या जिद्दी कार्यकर्त्यांनी दिला. बार्शीतील परांडा रोड वरील बोहरी स्मशानभूमीनजिक आपण लावलेल्या रोपट्यांकडे भर पावसात उमेश काळे, सतीश देशपांडे,प्रा.संपतराव देशमुख, राहूल ता्वरे, सचिन शिंदे, बाबासाहेब बकूळ,अक्षय घोडके, सुधीर वाघमारे,राहूल काळे, सुनिल फल्ले,मामा हवालदार,स़ंतोष मस्के, राणादादा देशमुख,पवन खरसडे, अमृतराव खेडेकर, संतोष पवार, राजाभाऊ लोहार, किशोर आपसकर, अजित नरगिडे, सचिन मनगिरे, डॉ.विजय पवार, शशी पोतदार धावले आणि आपल्या प्रिय रोपट्यांना खऱ्या अर्थाने आपल्या पंखाखाली घेतले!