टीम इंडियाचा माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचे ‘बाईक’ प्रेम सर्वांना माहीतच आहे. हे असताना पुन्हा एकदा धोनी चर्चेत आला आहे, मात्र तो बाईक मुळे नव्हे तर त्याने घेतलेल्या नवीन ट्रॅक्टर मुळे. याबाबत CSK ने धोनीचा एक व्हिडीओ आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये धोनी आपल्या नव्या वाहनावर बसून फेरफटका मारण्याचा आनंद घेताना दिसला आहे.
सीएसकेने ट्विटरवर धोनीचा ट्रॅक्टर चालविण्याचा आनंद घेतनाचा व्हिडिओ पोस्ट केला. ” #थाला धोनी आपल्या नव्या वाहनावर आरूढ होऊन राजा सरांना भेटला!”, असे पोस्टखाली लिहिले आहे.
चेन्नई सुपर किंग्जच्या व्हिडीओची दखल घेत अनेक प्रसारमाध्यमांनी धोनीच्या नव्या ट्रॅक्टर खरेदीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. एका संकेतस्थळाने धोनीने महिंद्रा कंपनीचा स्वराज ट्रॅक्टर विकत घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिद्रा कमेंट करत धोनीची स्तुती केली. त्यांच्याच कंपनीचा ट्रॅक्टर विकत घेतलेल्या धोनीबद्दल ते म्हणाले, “मला आधीपासूनच माहिती होतं की धोनीची निर्णयक्षमता आणि अंदाज बांधण्याचे सामर्थ्य खूपच