Latest Marathi News

BREAKING NEWS

धक्कादायक | मित्राच्या मदतीने प्रियकराची हत्या….

0

मुंबई |

महिलेने आपल्या मित्राच्या मदतीने प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली कोळेगाव परिसरात घडली. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी रविवारी महिलेसह तिच्या प्रियकराला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

मारुती हंडे हे एका महिलेसोबत लिव्ह इन रिलेशशिपमध्ये डोंबिवली कोळेगाव परिसरात राहत होते याच दरम्यान त्या महिलेची गुड्डू शेट्टी नामक व्यक्तिशी मैत्री झाली. तीचे गुड्डूशी प्रेमप्रकरण असल्याचा संशय मारुतीला होता. त्यामुळे या दोघांमध्ये वाद सुरू होते. संध्याकाळी संबंधित महिला व मारुती या दोघांमध्ये पुन्हा गुड्डूवरून वाद झाला. त्यावेळी गुड्डू देखील घरात उपस्थित होता. गुड्डू आणि तीने संतापाच्या भरात मारुती यांना बॅट आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.

यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मारुती यांना दोघांनी खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. मारूती यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तेथून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात दाखल केले गेले. त्याठिकाणी मारूती यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिला आणि तिचा मित्र गुड्डू शेट्टी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.