Latest Marathi News

BREAKING NEWS

जिल्हा परिषद सीईओ दिलीप स्वामी यांना ‘ या ‘ कार्यशाळेसाठी निमंत्रण

0

सोलापूर |

समग्र शिक्षा व स्टार्स प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोणावळा येथे 28 आणि 29 एप्रिल रोजी आयोजित केलेल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यशाळेत राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्यासह शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार आहेत.

मागील दोन वर्षात कोरोनामुळे राज्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी झाल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात कार्यरत सर्व घटकांनी एकत्र चर्चा करून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नपूर्वक कार्यवाही करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे सुरज मांढरे यांनी सांगितले.

केसरकर हे गेल्या आठवड्यात सोलापूर दौऱ्यावर आले असता पंढरपूर येथे सीईओ स्वामी यांनी राबवलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण केले होते. त्यानंतर सांगोला येथील ग्रामीण साहित्य संमेलनाला संबोधित करताना ही कार्यशाळा आयोजित करण्याचा मनोदय केसरकर यांनी व्यक्त केला होता. स्वामी यांनी राबविलेल्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करून त्यांना या कार्यशाळेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.