सुश्रुत हॉस्पिटलमध्ये नुकत्याच दोन केसेस घडल्या त्यातील
एक म्हणजे *श्री.शांतिनाथ मारुती पिंपळकर* वय वर्ष 45 रा.कपिलापुरी ता. परंडा हे गृहस्थ 31/07/2022 दुपारी चार वाजता डॉ.संजय अंधारे यांच्या हॉस्पिटलमध्ये घोणस या सापाने चावा घेतला म्हणून दाखल झाले. प्राथमिक तपासणी व रक्ताच्या तपासणीअंती विषारी जातीचा साप असल्याचे समजले. साप रुग्णांच्या उजव्या पायाच्या तळव्याला चावला होता व तशा खुणा देखील दिसत होत्या.
घोट्यापासून कंबरेपर्यंत सूज वाढत चाललेली दिसत होती अशा सापांच्या विष मुळे रुग्णाची हळूहळू लघवीचे प्रमाण कमी होऊन किडनी निकामी होत चाललेली दिसत होतं. परंतु योग्य वेळी योग्य तो उपचार व सर्पदंश विरोधी इंजेक्शन देऊन रुग्णांचे प्राण वाचवण्यात डॉ. अंधारे यांना यश आलं. सर्पदंश विरोधी इंजेक्शन ही परांडा येथील शासकीय रुग्णालयातून डॉक्टरांच्या मदतीमुळे उपलब्ध झाली. हॉस्पिटलचा व इतर औषधांचा खर्च हा महात्मा ज्योतिराव फुले या शासकीय योजने अंतर्गत मोफत करून रुग्णाला सुखरूप घरी पाठवण्यात आले आहे.आणि दुसरी केस रुग्ण *सौ.फुलवरे मिराबाई अशोक* वय वर्ष 30 राहणार. हातोला, तालुका वाशी, जिल्हा. उस्मानाबाद. पण विषारी सर्पदंशामुळे सुश्रुत हॉस्पिटल, बार्शी. येथे दिनांक 5/08/2022 सकाळी दहा वाजता दाखल झाले होते. सदरचा रुग्ण मात्र पहिला रुग्णांपेक्षा वेगळा आणि त्यापेक्षा विषारी सर्पदंशामुळे अत्यावस्थेत दाखल झाला होता. यांच्या डोळ्यावर झापड पडून श्वास बंद पडत चालला होता. रुग्ण वेळेत हॉस्पिटल पोहोचल्यामुळे तात्काळ त्यांना तोंडातून फुफुसामध्ये एक नळी टाकून कृत्रिम श्वासाच्या मशीनवर श्वसन प्रक्रिया सुरू करण्यात आली. व पाच ते सहा दिवसाच्या यशस्वी प्रयत्नानंतर रुग्णास घरी सोडण्यात आले. या रुग्णाचे रेशन कार्ड व आधार कार्ड उपलब्ध नसल्या कारणाने महात्मा ज्योतिराव फुले शासकीय योजनेअंतर्गत लाभ देता आला नव्हता परंतु या रुग्णाचा सर्व वैद्यकीय उपचार खर्च *मा.प्रा.श्री. तानाजी सावंत साहेब, आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य* यांनी उचलला आहे.
कोरोना महामारीत बार्शी व परिसरात देवदूत ठरलेले क्रॉकटेल ट्रीटमेंटचे जनक डॉ. संजय अंधारे सरांचं सामाजिक दायित्व व वैद्यकीय कर्तव्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे.