Latest Marathi News

BREAKING NEWS

दुर्दैवी घटना ! चूल पेटवताना भडका होऊन गाडेगाव येथे वृद्ध दाम्पत्य ठार

0

बार्शी |

तालुक्यातील गाडेगाव येथे आजची पहाट ह्रदय पिळवून टाकणाऱ्या घटनेनेच उजाडली. येथील पवारवस्ती परिसरात अंघोळीसाठी पाणी गरम करण्यास चूल पेटवताना आगीचा भडका होऊन वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला. याबाबत, माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

भिमराव काशिराम पवार (वय 95) आणि कमल भिमराव पवार (90) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबतीतील रितसर फिर्याद दाखल करणे सुरू असून पोलीस अधिक तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.