मुंबई |
सोशल मिडीयावर फिरत असलेल्या दलाई लामा सोशल मिडीयावर फिरत असलेल्या दलाई लामा यांच्या वादग्रस्त व्हिडिओच्या विरोधात मुंबईच्या आझाद मैदानात निदर्शने करण्यात आली. ६०० तिबेटियन नागरिकांनी यात सहभाग नोंदविला होता.
पुणे, नाशिक, वडोदरा आणि आजूबाजूच्या सर्व तिबेटियन, फ्रेंड्स ऑफ तिबेटियन, इंडियन बुद्धिस्ट असोसिएशनचे सभासद आणि दलाई लामा यांचे अनुयायी या निदर्शनात सहभागी झाले होते. आंदोलक तेन्झिन मेथोक यांनी सांगितले, आम्ही आमच्या गुरूंच्या सन्मानासाठी एकत्र आलो आहोत. दलाई लामा त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात येत आहे. आमच्या गुरूंनी लहान मुलांसोबत चुकीचे कृत्य केले असे माध्यमे ओरडून सांगत आहेत. ते चुकीचे आहे आम्ही खरा व्हिडीओ समोर आणला आहे. जो व्हिडीओ व्हायरल झाला तो खोटा आहे. हा व्हिडीओ संपादित करून मोडतोड करून बनवला आहे. खरा व्हिडीओ आमच्याकडे आहे तो आम्ही इथे दिला आहे. हा खोटा कोणी व्हायरल केला.
माध्यमांनी कोणतीही शहानिशा न करता तो कसा चालविला याची भारत सरकारने चौकशी करावी. हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या माध्यमांनी आणि सोशलमिडीया ऍक्टिव्हिस्टने गुरु दलाई लामा यांची क्षमा मागावी. आमच्या गुरूंनी नेहमी शांतीचा संदेश दिला आहे. इतकी वर्ष जगभरात त्यांनी दया, शांती आणि क्षमा ही मूल्ये पेरली. हा देश गांधीजींची तत्वे मानणारा आहे. मात्र इथे आमच्या गुरूंची बदनामी केली जाते आहे. आम्ही आज देशभरात नव्हे तर जगभरात निदर्शने करत आहोत. भारत सरकारने याची दखल घ्यावी, या आग्रही मागणीसाठी आम्ही निदर्शने करत आहोत.