Latest Marathi News

BREAKING NEWS

तुझ्यात जिव रंगला फेम कल्याणी कुरुळे- जाधव हिचा अपघाती मृत्यू…

0

कल्याणीने काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमधील हालोंडी फाटा येथे ‘प्रेमाची भाकरी’ नावाने हॉटेल सुरू केले होतं. हॉटेल बंद करुन बाहेर पडत असतांना तिला डंपरने जोरदार धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. या महामार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. कोल्हापूर सांगली महामार्ग पूर्णत: खड्डेमय झाला आहे. या आधीही या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहे.

कल्याणी मराठी टिव्ही जगतातील एक उभरती अभिनेत्री होती. अनेक मालिकांमध्ये तिने अभिनय केला होता. तुझ्यात जिव रंगला या मालिकेतुन ती लोकप्रिय झाली होती. कलाक्षेत्रात आपलं नाव करु पाहणारी एक अभिनेत्री कल्याणीच्या अशा अचानक जाण्याने मराठी मनोरंजन सृष्टिवर शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.