पुणे |
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आतापर्यंत त्यांचा मतदारसंघ असलेल्या कोथरूडच्या विकासासाठी अनेक स्तुत्य उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमणनमधीलच एक उपक्रम म्हणजे मोफत फिरते पुस्तकघर. चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदारसंघासाठी सुरू केलेल्या मोफत फिरते पुस्तकघर उपक्रमाला शनिवारी एक वर्ष पूर्ण झाले आहे. या निमित्ताने एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून कोथरुडकरांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी कोथरूडच्या विकासावर भाष्य करताना म्हटले कि, वाचन चळवळीच्या विकासासाठी राज्य सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे. राज्यातील सर्व ग्रंथालये ही माझ्याच अखत्यारीत येतात. त्यामुळे ग्रंथालयाच्या वाढीसाठी सरकारच्या माध्यमातून अनेक निर्णय घेतले. त्यात प्रामुख्याने ग्रंथालयांच्या अनुदान वाढीसह, गाव तिथे ग्रंथालय योजना राबविण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पाटील यांनी पुढे म्हटले कि, कोथरूडमध्ये वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी गेल्यावर्षी मोफत फिरते पुस्तक घर उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला कोथरुडकरांकडून अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. आजच्या आधुनिक काळात तंत्रज्ञानाचाही मोठा विकास झाला आहे. त्यामुळे आगामी काळात तरुणांना या वाचनसंस्कृतीत सहभागी होता यावं, यासाठी कोथरूड मध्ये दृकश्राव्य ग्रंथालयही सुरू करण्याचा मानस यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध लेखक-समिक्षक संजय जोशी, संजय कुलकर्णी, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद सायकर, नगरसेविका वासंती जाधव, नगरसेवक जयंत भावे आदी उपस्थित होते.