मुंबई |
राज्यात पुन्हा एकदा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आज 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
नाशिक महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आता साखर आयुक्त म्हणून नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. संजीव जयस्वाल यांची म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे. मात्र, जयस्वाल यांच्याकडे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव पदाचा पदभार देखील कायम राहणार. तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंडे यांचीदेखील बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे मराठी भाषा विभाग सोपवण्यात आला आहे.
कुणाची कोठे बदली?
१. सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदावर नियुक्ती करण्यात आली.
२. एस. व्ही. आर श्रीनिवास यांची एमएमआरडीएमधून धारावी पुनर्विकास प्रकल्पात नियुक्ती करण्यात आली.
३. बेस्टचे जनरल मॅनेजर लोकेश चंद्र यांची महाडिस्कॉमच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
४. राधिका रस्तोगी यांची विकास आणि नियोजन विभागात नियुक्त करण्यात आली.
५. महिला आणि बालकल्याण विभागातील आय. ए. कुंदन यांची अल्पसंख्याक विकास विभागात नियुक्ती करण्यात आली.
६. संजीव जयस्वाल यांची पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागातून म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
७. आशीष शर्मांची मुंबई महानगरपालिकेतून नगर विकास विभागात नियुक्ती करण्यात आली.
८. महाडिस्कॉमच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची बेस्टचे जनरल मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली.
९. खादी ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंशु सिन्हा यांची ओबीसी बहुजन कल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
१०. अल्पसंख्याक विभागाचे सचिव अनुप यादव यांची महिला आणि बालकल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
११. तुकाराम मुंढे यांची मराठी भाषा विभागाच्या सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.
१२. महाराष्ट्र मेरिटाईमच्या मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांची जल जीवन मिशनच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
१३. नाशिकचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची साखर आयुक्त (पुणे) म्हणून नियुक्ती करण्यात आली.
१४. उद्योग विभागाचे अतिरिक्त विकास आयुक्त डॉ. माणिक गुरसाल यांची महाराष्ट्र मेरिटाईमच्या मुख्यकार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली.
१५. कोल्हापूरचे आयुक्त कादंबरी बलकवडे यांची महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजेंसी, पुणेच्या (MEDA) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
१६. प्रदिपकुमार डांगे यांची पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागातून रेशीम विभागाच्या (नागपूर) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
१७. मनरेगाचे (नागपूर) आयुक्त शंतनू गोयल यांची सिडकोच्या (नवी मुंबई) सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
१८. लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांची माहिती तंत्रज्ञान विभागाचे (मुंबई) सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.
१९. एनआरएलएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांची पशुसंवर्धन (पुणे) विभागाचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.
२०. डॉ. सुधाकर शिंदे यांची मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (AMC) नियुक्ती करण्यात आली.