Latest Marathi News

BREAKING NEWS

….तर अजित पवार मुख्यमंत्री होतील ; एकनाथ खडसे यांचे विधान

0

मुंबई |

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका मुलाखतीत आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. अजित पवार यांच्या या व्यक्तव्यानंतर अनेक चर्चांना तसेच शक्यताना उधाण आलं. पण हे खरंच शक्य आहे का? कोणत्या पक्षातून अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतील? यावर राष्ट्रवादीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की, “सुप्रीम कोर्टाचा जजमेंट नेमकं काय येतं हे मला माहिती नाही. मात्र यातील १६ आमदार हे अपात्र झाले. तर राजकारणातलं चित्र आणखी बदलू शकते. जो १४५ चा आकडा पूर्ण करेल तोच यानंतर मुख्यमंत्री होईल. कदाचित अजित पवार हे मुख्यमंत्री होण्याचा १४५ चा आकडा जमवू शकतात. सध्या राजकारणात काही घडू शकतं. त्यामुळे पुढच्या कालखंडात या राज्याचे अजित पवार हे मुख्यमंत्री झाले असतील तर आश्चर्य वाटून घेऊ नका”, असं मोठं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे. “अजित पवार हे भाजपमध्ये जातील, असं मला वाटत नाही. राष्ट्रवादी पक्ष मोठा करण्यात त्यांचं फार मोठं योगदान आहे. याबाबत त्यांनी याचा विचारही केला असावा.

अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा ते अजित पवार हे भाजपसोबत गेले नव्हते ते राष्ट्रवादीतच होते”, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत. अजित पवार यांनी आपण मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याचं म्हटलं आहे. आपण उपमुख्यमंत्री होऊन वर्ष-वर्ष आपण कष्ट करतोय. त्यामुळे त्यांनी आपण मुख्यमंत्री होणार असल्याचं म्हटलंय. यात गैर काय? ”, असा प्रश्नही यावेळी एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. “एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा कोणता आकड्याचा खेळ होता? हा तर खोक्यांचा खेळ जमला”, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.